वाडा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७८ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजिक बांधिलकी जोपासली. वाडा शहरातील संपर्क कार्यालयात हे रक्तदान शिबिर पार पडले.
तसेच पोलीस भरती साठी आलेल्या विद्यार्थ्यांनी वाडा ग्रामीण रुग्णालय, वाडा पंचायत समिती, पोलीस ठाणे व तहसील कार्यालयाय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून सर्व परिसर स्वच्छ केला.
रक्तदान शिबिरास जिजाऊ महिला सक्षमीकरण प्रमुख हेमांगी हिरामण पाटील, जिजाऊ कामगार नेते महेंद्र ठाकरे, डॉ. गिरीश चौधरी, जिजाऊ संस्था पालघर जिल्हा प्रमुख अरविंद देशमुख, जिजाऊ संघटना वाडा तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील. ऍड. प्रफुल पष्टे, अंकुश चव्हाण, सागर महाडे, अजय घाडगे, मंगेश दुताडे. आदी मान्यवर उपस्थित होते.