Wednesday, July 3, 2024
Homeमहामुंबई‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’चे संपादक बबन कांबळे यांचे निधन

‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’चे संपादक बबन कांबळे यांचे निधन

मुंबई(वार्ताहर) : ‘दैनिक वृत्तरत्न सम्राट’चे सर्वसा संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे यांचे बुधवार, दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी अल्पशा आजारामुळे लाईफ लाईन हॉस्पिटल, ठाणे येथे वयाच्या ७०व्या वर्षी दुःखद निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर माजीवाडा, ठाणे येथील बाळकुम स्मशानभूमीत सायंकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी; दोन मुले कुणाल आणि कृपाल, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

ज्या चळवळीला स्वतःचे हक्काचे वृत्तपत्र नसते ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते हा ‘भारतरत्न’ महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आत्मसात करून बबन कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीला आपले वृत्तपत्र मिळवून देण्याच्या निर्धाराने दैनिक सम्राट हे वृत्तपत्र सुरू केले.

वरळीमध्ये ते राहत असतांना सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी भारतीय दलित पँथरच्या चळवळीला पाठिंबा दिला. ते ‘नवाकाळ’मध्ये पत्रकार म्हणून काम करतांना त्यांनी आपली पत्रकारिता गाजविली. पुढे २००३ पासून स्वतंत्र वृत्तरत्न सम्राट हे दैनिक सुरू केले. राज्यातील अनेक बौद्ध, बहुजन, मागासवर्गीय यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला चकराप देऊन न्याय मिळवून देण्याचे महानकार्य त्यांच्या धारधार लेखणीने दैनिक सम्राटच्या माध्यमातून केले़ त्यांचे हे ऐतिहासिक योगदान आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे़

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -