'या' भारतीय क्रिकेटपटूंचे प्रेम झाले सफल

भारतीय क्रिकेटपटूंचा आता जगातील टॉप सेलिब्रिटींमध्ये समावेश होतो. भारतीय क्रिकेटमधील बहुतेक स्टार्सचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. गेल्या वर्षी तसेच या वर्षी लग्नबंधनात अडकलेल्या क्रिकेटर्सची लव्ह स्टोरी घेऊया जाणून.




युझवेंद्र चहल
आयपीएल २०२० पूर्वी, युझवेंद्र चहलने धनश्री वर्मासोबतच्या त्याचे नाते जाहिर केले. धनश्रीने आपल्या प्रियकराला सरप्राईज करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा प्रवासही केला. भारताच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यानंतर, चहल भारतात परतला आणि २२ डिसेंबर रोजी लग्न केले.




हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्याने १ जानेवारी २०२० रोजी त्याच्या साखरपुड्याच्या बातमीने चाहत्यांना सुखद धक्का दिला. पांड्याने दुबईमध्ये सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविक सोबतच्या एंगेजमेंट व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर लवकरच, हे जोडपे भारतात परतले आणि हार्दिकने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. लॉकडाऊनच्या काळात हार्दिकने तिच्याशी लग्न केले. या जोडप्यासा अगस्त्य नावाचा मुलगा आहे.




जयदेव उनाडकट
जयदेव उनाडकट हा डावखुरा वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मोजक्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. जयदेव उनाडकटने २ फेब्रुवारी २०२१ रोजी रिनी कांटारियासोबत लग्न केले. त्यांच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

वरुण चक्रवर्ती
वरुण चक्रवर्ती आयपीएल २०२० नंतर मायदेशी परतला तेव्हा त्याने त्याची जूनी मैत्रीण नेहा खेडेकरशी लग्न केले. चेन्नईमध्ये एका शानदार सोहळ्यात दोघांचे लग्न झाले.

विजय शंकर
विजय शंकर याने २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व केले. दुर्दैवाने, स्पर्धेदरम्यान विजयला त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. त्यामुळे २०२१ सालची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीही तो मुकला. शंकरने २०२१ च्या सुरुवातीला त्याची फिओन्से (साखरपुडा झालेली) वैशाली विश्वेश्वरनशी लग्न केले.

के एल राहुल
के एल राहुल आणि आथिया शेट्टी या वर्षी जानेवारीला लग्नबंधनात अडकलेच. त्यांच्या चाहत्यांना दोघांच्याही लग्नाची प्रतीक्षा होती. आथिया शेट्टी ही सिनेकलाकार सुनी शेट्टी याची मुलगी आहे.
Comments
Add Comment

बॉलिवूडची ग्लॅम नायिका दीपिकाने अखेर आठ तासांच्या ड्युटीबद्दल सोडले मौन!

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची नायिका दीपिका पादुकोण मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. दीपिका आई

गणिताचे महत्त्व

करिअर : सुरेश वांदिले गणितीय कौशल्यामुळे विविध व्यामिश्र समस्या अधिक साकल्याने समजून घेणे सुलभ जाते. विश्वाची

थिएटर नाही; तर वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहातच लावले चित्रपटाचे शो!

‘कुर्ला टू वेंगुर्ला’चे सर्व शोज हाऊसफुल्ल माती आणि नाती जोडणारा सिनेमा असे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, तो

अभिनेते अजय पूरकर साकारणार खलनायक

नायकाप्रमाणे क्रूर खलनायकही चित्रपटांत गाजलेत! याआधी सकारात्मक भूमिकेत दिसलेले कलाकार आता नकारात्मक पात्र

तीन दिवसांचा माणिक स्वर महोत्सव

महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका, पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी (२०२५–२०२६) वर्षानिमित्ताने देशभरात

हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला विरोध!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा कल