नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गटाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर केलेल्या दाव्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल आल्यानंतरच निकाल देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी निकाल देऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये असा युक्तीवाद उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाने वेगळा निकाल दिल्यानंतर काय? असा प्रश्न ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोरील सुनावणीसमोर उपस्थित केला होता. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी चर्चा केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच निकाल देणार असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये १४ फेब्रुवारी रोजी नियमित सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने मागील आठवड्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाची बाजू ऐकून घेतली होती. परंतू केंद्रीय निवडणूक आयोग आत्ताच निकाल देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या होणा-या पोटनिवडणुकांच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाला निकाल देणे शक्य होणार का? यासंदर्भात शिंदे गट आणि ठाकरे गटातील युक्तीवादादरम्यान चर्चा झाली. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील एकत्रित सुनावणीनंतरच निवडणूक आयोग निकाल देणार आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…