Sunday, May 11, 2025

देशमहत्वाची बातमी

राफेल डीलवरून मोदींचा विरोधकांवर निशाणा

राफेल डीलवरून मोदींचा विरोधकांवर निशाणा

बेेंगळूर (वृत्तसंस्था): नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कर्नाटकातील तुमाकुरू येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी या काळात लाइट युटिलिटी हेलिकॉप्टरचे (LUH) अनावरणही केले. आपल्या भाषणात मोदींनी नाव न घेता राफेल डीलवरून काँग्रेसवर निशाणा साधला.


पंतप्रधान म्हणाले आमच्या सरकारवर विविध प्रकारचे खोटे आरोप लावले गेले. राफेल जेटवरून लोक भडकले आणि संसदेचा वेळ वाया गेला. एचएएल हेलिकॉप्टर फॅक्टरी आणि तिची वाढती क्षमता खोटे आरोप करणाऱ्यांचा पर्दाफाश करेल, असेही ते म्हणाले. फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानांची केलेल्या खरेदी वादग्रस्त असल्याचे म्हटले जाते.
लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) हे ६१५ एकरवर बांधलेल्या हेलिकॉप्टर कारखान्यात तयार केले जातील. हा आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना असून त्याची पायाभरणी मोदींनी २०१६ मध्ये केली होती. सुरुवातीला लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर येथे बनवले जातील. हा कारखाना भारताची हेलिकॉप्टरची गरज भागवण्यास सक्षम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर हे स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर आहे. सुरुवातीला या कारखान्यात दरवर्षी सुमारे ३० हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत.



ड्रोन ते तेजस विमान कर्नाटकात बनवले जात आहे


पीएम मोदी म्हणाले की, कर्नाटक ही नवनिर्मितीची भूमी आहे. ड्रोन ते तेजस विमाने राज्यात बनवली जात आहेत. कर्नाटक गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरली आहे. पंतप्रधान म्हणाले की, भारत आता विमानवाहू आणि लढाऊ विमानांसाठी आधुनिक असॉल्ट रायफल तयार करत आहे. आज आपण आपल्या सैन्याला केवळ मेड इन इंडिया शस्त्रे देत नाही, तर २०१४ च्या तुलनेत आपली संरक्षण निर्यात अनेक पटींनी वाढली आहे.

Comments
Add Comment