Wednesday, July 24, 2024
Homeराशिभविष्यसाप्ताहिक राशिभविष्यHoroscope : साप्ताहिक राशिभविष्य

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, दि. ४ ते ११ फेब्रुवारी २०२३

मुलाखती यशस्वी होतील
मेष – या सप्ताहात सुरुवातीला मिश्र फळे मिळतील. रोजच्या दैनंदिन कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता. महत्त्वाची कामे पुढे ढकलली गेल्यामुळे स्वभावात चिडखोरपणा येईल. अशा वेळेस मनात राग धरून इतरांशी वागू नका. आपल्या वागण्यात विनयशीलता आवश्यक आहे. स्वतःच्या वागण्यावर तसेच बोलण्यावर नियंत्रण आवश्यक राहील. कुटुंबात तसेच आपल्या कार्यस्थळी लहान-सहान कारणांवरून वाद निर्माण होऊ शकतात. ते टाळणे हितकारक ठरेल. नोकरीत राजकारण तसेच गटबाजीपासून अलिप्त राहण्यात आपले हित आहे, हे लक्षात ठेवा. नोकरीविषयक दिलेल्या मुलाखती यशस्वी होतील.
चिंता मिटतील
वृषभ –आरोग्य चांगले राहून आरोग्याच्या चिंता मिटतील. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींनी आपल्या संगतीवर विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. कुसंगत टाळा. वेळेचा अपव्यय टाळून होणारे नुकसान कमी करता येईल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक आघाडी मजबूत राहील. जुन्या गुंतवणुका फायदेशीर ठरतील. नवीन गुंतवणूक यशस्वी ठरतील. मात्र नवीन गुंतवणूक करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी पडू शकतो. व्यवसाय-धंद्यात प्रगतिकारक कालावधी आहे. काही नवीन फायद्याचे सौदे हाती येतील. व्यवसाय विस्ताराच्या योजना नियोजन सफल होईल.
प्रगती झालेली दिसेल
मिथुन –या आठवड्यात एकूण बहुतेक क्षेत्रात प्रगती झालेली दिसेल, मात्र प्रयत्नात कमी पडू देऊ नका तसेच इतरांवर अवलंबून न राहता स्वतःची कामे स्वतः करा. आळस, चालढकल नको. कुटुंब परिवारातील उत्साही, आनंदी वातावरणाचा लाभ घेता येईल. तरुण-तरुणींना आपला मनपसंत जीवनसाथी निवडता येईल. काहींचे परिचयोत्तर विवाह निश्चित होतील. प्रेमप्रकरणात यश मिळून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. वैवाहिक जीवनात सुवार्ता मिळतील. व्यवसाय-धंदा-नोकरीत अपेक्षित लाभ मिळतील. जुनी व्यावसायिक येणी वसूल झाल्यामुळे कर्जमुक्तीचे समाधान अनुभवण्यास मिळेल तसेच नवे करार-मदार होतील.
सतर्क राहणे गरजेचे ठरेल
कर्क – स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष द्या. खाण्या-पिण्यावरील निर्बंध अवश्य पाळा. काही वेळेस मानसिक अस्वास्थ्य निर्माण करणाऱ्या घटना निर्माण होऊ शकतात. सतर्क राहणे गरजेचे ठरेल. विशेषतः लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे नितांत गरजेचे असेल. नोकरी तसेच व्यवसायात मनाविरुद्ध घटनांना काही वेळेस सामोरे जावे लागू शकते. खर्चात अचानक झालेली वाढ आश्चर्यचकित करेल. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढतील. निरनिराळ्या उत्सव समारंभाची निमंत्रणे मिळतील; परंतु स्वतःच्या हट्टीपणाला नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक गरज भागेल. सरकारी कायदेकानून निर्बंध पाळा. सरकारी स्वरूपाच्या कामात यश मिळेल.

मोठे लाभ संभवतात
सिंह – शुभ ग्रहमान लाभल्यामुळे हा आठवडा अविस्मरणीय ठरू शकतो. बहुतेक शेतात शुभ फळे प्रतिपादित झाल्यामुळे उत्साही आणि आनंदी राहाल. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील. विवाह करण्यातील अडचणी दूर होऊन विवाह निश्चित होतील. कुटुंब परिवारात आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. आलेली संकटे परस्पर जातील. चिंतामुक्त व्हाल. रोगांवर मात कराल. नोकरी-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. व्यवसाय-धंद्यात मोठे लाभ संभवतात.
वरिष्ठांचे सहकार्य मिळेल
कन्या – कुटुंब परिवारात वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. विशेषतः कुटुंबातील मुला-मुलींबरोबर वाद-विवाद अथवा मतभेदांची शक्यता आहे तसेच मुला-मुलींनी कुसंगती टाळणे महत्त्वाचे ठरेल. नाही त्या गोष्टी मागे लागून कुटुंबातील शांततेचा भंग होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. प्रेमप्रकरणात जरा जपूनच पुढील पावले उचलणे आवश्यक आहे. विरोधात प्रखरता येऊ शकते. व्यवसाय-धंद्यात कलहसदृश्य प्रसंग टाळावेत. काही वेळेस सहकार्य मिळण्यात अडचणी येतील. स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक राहील. कुटुंब परिवारात मंगलकार्याची नांदी होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
धनलाभाची शक्यता
तूळ – या आठवड्यात आपल्या वागण्यावर तसेच बोलण्यावरती नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे. नोकरी-व्यवसाय धंद्याच्या ठिकाणी लहान-सहान अथवा किरकोळ कारणावरून वादविवाद घडण्याची शक्यता आहे. त्या वादविवादांच्या रूपांतर कलहसदृश प्रसंगात होऊन नाती कायमची दुखावली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंब परिवारात इतरांच्या मतास उचित प्राधान्य द्या. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींना स्पर्धात्मक यश मिळेल, उच्च शिक्षण घेण्यातील अडथळे दूर होऊन गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल.
अपेक्षित यश लाभेल
वृश्चिक – नोकरी-व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. त्यामुळे कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्याचे समाधान मिळेल. आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयात आपल्या जीवनसाथीची महत्त्वाची भूमिका असेल. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत मानसन्मानाचे योग, बढतीची तसेच वेतन वृद्धीची शक्यता आहे. अतिरिक्त कार्यभार सोपवला जाऊ शकतो, मात्र बदलीची तयारी ठेवावी लागेल. प्रलोभनांपासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल. नव्या संकल्पनांचा वापर व्यवसायासाठी पोषक ठरेल. विद्यार्थ्यांना यश लाभेल.
महत्त्वाचे करारमदार होतील
धनु – सदरील कालावधी सर्वतोपरी शुभंकर म्हणता येईल. आपल्यासमोरील महत्त्वाचे ध्येय गाठण्यात यश मिळेल. महत्त्वाची कार्ये पूर्ण करता येतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल. विशेषत: जमीन व मालमत्तेच्या संदर्भातील कार्य पूर्ण करण्यासाठी वेळ द्या. वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले वाद-विवाद टळतील. नोकरी-व्यवसाय धंद्यातील आलेले संकट दूर होईल. आर्थिक मदत मिळेल. नोकरीतील समस्या सुटतील. नवे व्यवसाय प्रकल्प सुरू करता येतील. महत्त्वाचे करारमदार होतील. कर्ज मंजूर होतील. बँकांची कामे हातावेगळी करता येतील. महिन्याच्या पूर्वार्धात कौटुंबिक आघाडीवर सतर्क राहणे आवश्यक ठरेल.
गैरमार्गाचा अवलंब करू नका
मकर – पूर्वार्धात साडेसातीच्या झळा जाणवू शकतात. विशेषतः तरुण-तरुणींनी शिस्तबद्ध रीतीने वागणे आवश्यक आहे. तसेच कटाक्षाने कुसंगती टाळा ते हिताचे ठरेल. आपले कार्य साधण्यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका. शॉर्टकट टाळा. एखादा निर्णय घेताना त्याचा पूर्णपणे विचार करूनच शांतपणे निर्णय घ्या. नोकरीत आपले कामाविषयीचे ज्ञान अद्ययावत ठेवा. वक्तशीर राहा. शिस्त पाळा. कामात चालढकल नको. विशेषतः सरकारी स्वरूपाच्या नोकरीमध्ये आपल्या अधिकाऱ्याच्या कार्यकक्षा ओळखून आपले काम पूर्ण करा. लहान-मोठ्या प्रलोभनांना बळी पडू नका. प्रलोभनातून फसवणूक होऊ शकते. कायदे कानून अवश्य पाळा.
वास्तुविषयक कार्य
कुंभ – या कालावधीत आपल्याला नशिबाची साथ मिळण्याबरोबरच शुभग्रहांची साथसंगत लाभल्यामुळे होणाऱ्या कुयोगावर यशस्वी मात करता येईल. नियोजित कार्य वेळेवर पूर्ण होतील. सरकारी स्वरूपाच्या कामात ओळखी मदतीचा उपयोग होईल. दीर्घकाळ रखडलेली कामे गतिमान होतील. वास्तुविषयक कार्य, जमीन-जुमला याविषयीची कार्य पूर्णत्वाच्या मार्गावर असतील. कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी राहून कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या विवाहामधील अडचणी समस्या दूर होऊन विवाह निश्चित होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.
व्यावसायिक तेजी येईल
मीन – लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे आवश्यक आहे. सर्वच बाबतीत विचित्र आर्थिक कोंडी झाल्यासारखे अनुभवण्यास मिळू शकते. खर्च वाढू शकतो. त्यातच कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढतील. व्यवसाय-धंद्यावर बदलत्या सहकारी गुणांचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. सतर्क राहा. नव्या नियोजनाची गरज भासू शकते. मात्र उलाढाल वाढल्याने व्यावसायिक तेजी अनुभवू शकाल. व्यावसायिक उत्सव, प्रदर्शने यशस्वी होऊन परदेशी व्यापाराच्या संधी उपलब्ध होतील. कुटुंब परिवारातील चालू असलेले वाद-विवाद संपुष्टात येतील. वैवाहिक जीवनातील प्रश्न सुटतील. जीवनसाथीबरोबर मधुर संबंध राहतील. कुटुंब-परिवार धार्मिक कार्याचे नियोजन होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -