Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘पठाण’ फिवर कायम; जगभरात धुमाकूळ

‘पठाण’ फिवर कायम; जगभरात धुमाकूळ

प्रदर्शनाआधीच खूपच वादग्रस्त ठरलेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने केवळ भारतातच नाही, तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात ‘पठाण’ फिवर पाहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने केवळ भारतातच नाही, तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरुखने ‘पठाण’ या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. हा चित्रपट रिलीज होऊन दहा दिवस होऊन गेले आहेत. सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर आठव्या दिवशी म्हणजेच, बुधवारी १ फेब्रुवारी रोजी १८ कोटींची कमाई केली होती. रमेश बाला यांनी ट्वीट शेअर करून पठाणच्या कलेक्शनची माहिती दिली. लवकरच हा चित्रपट ३५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असे म्हटले जात आहे.

रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी ‘पठाण’ने ५५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ६८ कोटी, तिसऱ्या दिवशी ३८ कोटी, चौथ्या दिवशी ५१.५० कोटी आणि पाचव्या दिवशी ६५ कोटींची कमाई केली आहे. तसेच, सहाव्या दिवशी या चित्रपटाने भारतामध्ये २५ कोटींचे कलेक्शन केले. मंगळवारी ३१ जानेवारीला या चित्रपटाने २३ कोटींचे कलेक्शन केले.
‘पठाण’ चित्रपट हा ३०० कोटींच्या क्लबमध्ये सर्वात लवकर सामील होणारा चित्रपट ठरला आहे. पठाण हा चित्रपट बाहुबली-२ हिंदी (१० दिवस), ‘केजीएफ २’ हिंदी (११ दिवस), दंगल (१३ दिवस), संजू (१६ दिवस), टायगर जिंदा है (१६ दिवस), पिके (१७ दिवस) वॉर (१९), बजरंगी भाईजान (२० दिवस), सुल्तान (३५ दिवस) या चित्रपटांना मागे टाकत सर्वात कमी दिवसांत ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला आहे. पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खानने देखील कॅमिओ केला आहे.

-दीपक परब

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -