Share

मुलांवरील अतिविश्वास किंवा अतिप्रेमामुळे एखादा उच्चशिक्षित उच्च अधिकारी पिताई किती हतबल होतो. याचं उदाहरण म्हणजे अभयचे वडील. अभय आणि शर्मिला असे दोन अपत्य असलेले नारायण हे उच्चशिक्षित व सरकारी अधिकारी म्हणून रिटायर झालेले होते. काही वर्षांपूर्वीच त्यांची पत्नी रमा हिचं निधन झालेलं होतं. नारायण यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केलेलं होतं. अभय तर सिव्हिल इंजिनीयर होता व शर्मिलाही ग्रॅज्युएट झालेली होती. शर्मिला ही सुरुवातीपासून उद्धट आपलं तेच खरं अशा विचित्र स्वभावाची होती. त्यामुळे तिचं कधी वडिलांशी पटत नव्हतं आणि त्याच दरम्यान अभयने इंटरकास्ट मॅरेज केलं. नारायण यांच्या डोळ्यांत अभय खुपू लागलेला होता. पण अभयची पत्नी अंजली ही स्वभावाने सात्त्विक अशी होती आणि अभयने आपल्या वडिलांचा आणि बहिणीचा स्वभाव तिला अगोदरच सांगितलेला होता. त्यामुळे ती दोन्ही व्यक्तींची सांभाळून आणि समजूतदारपणे वागत होती. त्याच दरम्यान शर्मिलाचेही लग्न ठरलं. साऊथ इंडियन असल्यामुळे नारायण यांनी शर्मिलाच्या लग्नामध्ये भरपूर हुंडा आणि पंचवीस ते तीस तोळं सोनं शर्मिलाला दिलेलं होतं. अभय आणि त्याची पत्नी आता नारायण यांची व्यवस्थित काळजी घेऊ लागले होते. नारायण आणि अंजलीचं आता चांगल्या प्रकारे पटत होतं, कारण त्यांना समजून चुकलं होतं की, अंजली आपली काळजी घेणार आहे आणि अभय हा सिव्हिल इंजिनीअर असल्यामुळे सतत त्याच्या बाहेरच्या प्रोजेक्टच्या ट्रीप असायच्या, त्यामुळे अंजलीच घरामध्ये असायची. अभय हा ज्या सोसायटीमध्ये राहायचा, त्या सोसायटीतल्या कमिटी मेंबर यांच्या वागण्याने बोलणं हे चुकीचं असायचं ते तो आपल्या वडिलांना सांगायचा आणि एखादी गोष्ट तो कायदेशीर करत असायचा. ते सोसायटीतल्या मेंबर लोकांना आवडत नसायचं. त्यामुळे अभय आणि वडिलांमध्ये छोटे-मोठे खटके उडायला लागले. शर्मिला आपल्या सासरी नांदायला मागेना, कारण त्यांच्या परंपरेनुसार चार वाजता उठून देवपूजा वगैरे तिला करायला लागत होती आणि ते तिला जमत नव्हतं, म्हणून ती आपल्या नवऱ्याला घेऊन वेगळी राहायला गेली आणि त्यासाठीही तिने घर घेतलं. कर्ज घेतलं. त्याचा खर्च नारायण यांना तिने करायला लावलेला होता. नारायण यांनी शर्मिला हिच्या लग्नामध्ये हुंडा सोनं आणि आता फ्लॅटमध्ये अर्धे पैसे दिलेले होते. त्याच्यामुळे नारायण अभयला बोलले की, हा जो फ्लॅट आहे तो आता पूर्णपणे तुझा आहे. याच्यावर कोणाचा अधिकार नाही. वडिलांच्या या गोष्टीवर अभय विश्वास ठेवून होता आणि इकडे शर्मिला हिला घेतलेल्या नवीन फ्लॅटचे हप्ते बँकेचे व्यवस्थित देता आले नाहीत म्हणून बँकेने शर्मिलाचा फ्लॅट आपल्या ताब्यात घेतला. शर्मिला ही आपल्या सासऱ्याच्या हाता-पाया पडून पुन्हा सासऱ्याच्या घरी राहायला गेली व तेथील राहत असलेल्या दिरास घराच्या बाहेर काढून सासऱ्याच्या घरात स्वतः राहू लागली. इकडे अभयकडे नारायण आणि अभय यांचे छोटे-मोठे वाद होऊ लागल्यामुळे नारायण यांनी स्वतः अभयला वेगळं राहण्यास सांगितलं. अभय याने विचार केला की, वडिलांना थोडे दिवस एकटे राहू दे, मग त्यांना एकटेपणा काय असतो हे समजेल आणि आपोआप ते आपल्याला बोलावतील, असा त्यावेळी अभयाने विचार केला व वडील राहत असलेल्या सोसायटीच्या काही अंतरावर त्यांनी भाड्याने रूम घेऊन अभय आणि त्याची पत्नी राहू लागली. वडिलांना म्हणजे नारायण यांना कॅन्सर झाल्यामुळे वडिलांची पुढील काळजी कशी घ्यायची यासाठी तो आपल्या बहिणीला भेटायला गेला असता शर्मिला हिने मला तुझ्याशी बोलायचं नाहीये आणि जी काय काळजी घ्यायची ती मी घेईन, असं तिने दारावर उभे राहून अभयला सांगितलं. अभयलाही वाटलं की, आपल्या बहिणीने सांगितलेले आहे म्हणजे ती वडिलांची काळजी घेईन. तरीही अभय आणि अंजली वडिलांना भेटायला जात होते. विचारपूस करत होते. शिवाय हॉस्पिटलमध्ये जो काही खर्च होत होता तो अभयच बघत होता. त्याचवेळी नारायण यांनी विल बनवलं आणि एक झेरॉक्स अभयला देऊन त्याच्यावर त्यांनी साइन करून घेतलेली होती. ते विल अभयकडे होतं. या दरम्यान अभयला दोन मुलं झाली होती आणि त्या मुलांना घेऊन अंजली नारायण यांना भेटायला जायची. कधी कधी नारायण स्वतः मुलांना घेऊन ये असं सांगायचे आणि अंजली जायच्या तयारीत असली की शर्मिलाचा फोन यायचा की आता नको, त्यांची तब्येत बरी नाही, नंतर बघू असं ती सांगायची. शर्मिला असं का सांगते याचा विचार त्यावेळी अंजलीने कधी केला नाही.

नारायण यांचं मुंबई आणि गाव असं येणं-जाणं होतं. असा योग आला की, अभय अंजलीला एकदा गावाकडे लग्नाला जावं लागलं त्यावेळी त्यांना समजलं की, त्याची बहीण शर्मिलाही नारायण यांची काळजी घेत नाहीये. मंदिरांमध्ये नारायण हे जेवण करतात. याबद्दल अभयने नारायण यांना काही विचारलं नाही. मुंबईला आल्यावर त्यांनी नारायणला याबाबत विचारले असता नारायण यांनी काही उत्तर दिलं नाही. अभय हा काही दिवसांनी आपल्या कामानिमित्त पुण्याला गेला होता आणि त्याला संध्याकाळी आठ वाजता नारायण सीरियस आहेत म्हणून मुंबईला ये म्हणून फोन आला. म्हणून अभय मुंबईत रवाना झाला.

मुंबईला आल्या आल्या हॉस्पिटलमध्ये गेला. त्यावेळी शर्मिलाचा पती तिथे हजर होता आणि काही कागदपत्रांवर अभयचे सह्या हव्या होत्या म्हणून तो तिथे थांबला होता. अभय हॉस्पिटलच्या पेपरवर सह्या करेपर्यंत शर्मिला आणि तिच्या नवऱ्याने हॉस्पिटलमधून पळ काढलेला होता. नारायण यांचा मृत्यू दुसऱ्या दिवशी सकाळी झाला. सगळं हॉस्पिटलचे बिल अभयाने भरलं. त्यावेळी त्याला समजलं की, नारायण यांना दुपारी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेलं होतं. अभयला रात्री आठ वाजता फोन का करण्यात आला होता आणि तोही फोन अभयाची बहीण शर्मिला हिने न करता अभयच्या नात्यांमधल्या एका आत्याने केलेला होता आणि हळूहळू सोसायटीतली लोकं अभयला सांगू लागले की, त्याचे वडील सकाळी सात वाजता मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हाच रस्त्यात पडले होते. सकाळी सात वाजता पडली, तर रात्री आठ वाजता अभयला का माहिती देण्यात आली, हा मोठा प्रश्न आता अभय समोर उभा राहिला होता. वडिलांचे ज्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी घरामध्ये हॉस्पिटलच्या फाईल पडलेल्या होत्या. अभय चालत होता त्यावेळी शर्मिला हिने आता सगळं ठेव, उद्या बघ असं त्याला सांगितलं आणि घरातून बाहेर काढलं आणि घराला टाळे लावून तिने अभयला आपल्या घरी आणि स्वतः आपल्या घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी अभय परत सोसायटीमध्ये आला. कारण लोक आपल्याला भेटायला येतील म्हणून तो आलेला होता. घर उघडून साफसफाई करायला लागलेला असताना त्याच्या लक्षात आलं की, काल हॉस्पिटलच्या ज्या फाईल तो बघत होता त्याच्यातली एकही फाईल तिथे आता दिसत नव्हती. त्याबद्दल त्यांनी शर्मिलाला फोन करून विचारले असता शर्मिलाने सरळ सांगितलं की, तुला त्या हॉस्पिटलच्या फाईलची गरज काय? आजपर्यंत आम्ही नारायण यांची काळजी घेतलेली होती. त्यामुळे त्या फाईल माझ्याकडे राहतील. पण अभयचं असं लक्षात आलं की आजपर्यंत वडिलांना हॉस्पिटलचा खर्च झाला तो त्यांच्या इन्शुरन्समधून केला होता. मग शर्मिला फाईल का घेऊन गेली? त्याचप्रमाणे घरातील वडिलांचे इतर कागदपत्रे गायब होते. एवढेच नाही तर बँकेचे पासबुकही तिथे नव्हते. म्हणून अभयने बँकेत चौकशी केली असता नॉमिनी म्हणून शर्मिलाने स्वतःचं नाव टाकलेलं होतं आणि अभयचं नाव काढलेलं होतं आणि वडिलांची जेवढी सेविंग होती तेवढे पैसे तिने बँकेतून लंपास केली होती. आता अभयला धक्का बसला.

जे नारायणचं घर होतं त्या घरावर अभय नॉमिनी होता हे त्याला आजपर्यंत माहीत होतं, तरीही त्याने चौकशी केली असता तिथेही अभय आणि शर्मिला त्याला नॉमिनी आढळली. अभयने विचार केला, आता वडील नाही तर आपण आपल्या जुन्या घरात राहायला जाऊ, तर शर्मिलाने सोसायटीला दमदाटी करत मीही नॉमिनी असल्यामुळे त्याला घरात घुसू द्यायचे नाही, असे सांगितले. आता वडील गेल्यानंतर भावाच्या प्रॉपर्टीत हक्क दाखवून भावाला बेघर करण्याचा मार्ग पत्करला. अभयने तिला तीन नोटिसा पाठवल्या. वकिलामार्फत त्या नोटिसांनाही तिने उत्तर दिलं नाही. पहिली नोटीस शर्मिलाच्या सासऱ्याच्या हातात पडताच त्यांनी ती वाचत, ‘माझ्या घरात जबरदस्तीने आलीस, आताही तुझं समाधान झालेलं नाही. तर तू भावालाही बरबाद करायला निघाली आहेस का?’ त्यामुळे त्यांच्यात कडाक्याचे भांडण होऊन सासऱ्यांना ॲटॅक येऊन ते गेले.

घर असूनही एक बहीण आपल्या भावाला कसं बेघर करू शकते ते या नॉमिनीमुळे झाले आणि हा नॉमिनीचा प्रकार पाहता आपल्या भावाला आणि वडिलांना अंधारात ठेवून शर्मिलाने केलेला एक मोठा गुन्हा आहे.
-ॲड. रिया करंजकर

(सत्य घटनेवर आधारित)

Recent Posts

Sachin Tendulkar: “हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…

20 minutes ago

Mumbai BMW hit and run case : गाडी थांबवता आली असती, पण माणुसकी हरवली…

वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…

21 minutes ago

Ladki Bahin Yojana : तारीख ठरली! लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये

मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…

28 minutes ago

Ram Charan: अभिनेत्याच्या जिद्दीला सलाम! केलं कठोर व्रत आणि अखेर चित्रपटाला मिळालं ऑस्कर!

मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…

34 minutes ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर २४ तासाच्या तपासाची माहिती! दहशतवाद्यांबद्दल ४ गोष्टी जाणून घ्या

नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…

1 hour ago

Load shedding : उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली! भारनियमन होणार का?

मुंबईचा वीज वापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील…

1 hour ago