Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

मेहंदी है सजनेवाली...कियारा मनीष मल्होत्रासोबत एअरपोर्टवर दाखल

मेहंदी है सजनेवाली...कियारा मनीष मल्होत्रासोबत एअरपोर्टवर दाखल

मुंबई: सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधण्यास सज्ज झालेली कियारा अडवाणी, मनीष मल्होत्रा याच्यासोबत जैसलमैर विमानतळावर दिसली. त्यामुळे कियाराचा लग्नाचा पेहराव कोण डिझाईन करणार हे एव्हाना चाहत्यांच्या लक्षात आलेच असेल. जैसलमेरमधील सुर्यगढ येथे ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या पंजाबी लग्नसोहळ्याला जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहतील असे समजले आहे.

दरम्यान ५ फेब्रुवारीला होणारा मेहंदी सोहळा ४ फेब्रुवारी रोजीच झाल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये होऊ लागली आहे. यामागे कारणं ठरलाय एक फोटो. कियाराचा हाताला मेहंदी लावतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा फोटो नेमका कधीचा आहे हे जाणून घेऊ.

सेलिब्रेटी कलाकार वीणा नागदा मेहंदी सोहळ्यासाठी आधीच जैसलमेरला पोहोचली आहे. ती कियारा आणि सिद्धार्थच्या नात्यातील महिलांच्या हातावर मेहंदी काढेल. हा समारंभ आज दुपार किंवा संध्याकाळनंतर होईल, असे सांगण्यात येतेय. मग समाजमाध्यमांवर व्हायरल होणारा फोटो कोणाचा आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या संगीतसमारंभात काला चष्मा, बिजली या गाण्यावर धमाल डान्स होईल. आता जाणून घेऊ की सिड-कियाराच्या लग्नाला कोणते सेलिब्रिटी हजेरी लावतील...

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील पाहुण्यांची यादी

सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या लग्नासाठी शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर, करण जोहर, मनीष मल्होत्रा, वरुण धवन आणि अश्विनी यार्दी हे सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

आता जाणून घेऊ व्हायरल फोटो मागचं सत्य

काही महिन्यांपूर्वी कियाराने एक जाहिरात केली होती. त्या जाहिरातीत तिचं लग्न दाखवण्यात आलं होतं. त्यादरम्यानचा मेहंदी काढतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा