Monday, May 19, 2025

महामुंबईमनोरंजन

अनू मलिक आणि राजपाल यादव यांचा गौरव

अनू मलिक आणि राजपाल यादव यांचा गौरव

मुंबई (वार्ताहर) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्योग, व्यवसाय, कला व समाजकार्य या विषयांमध्ये कार्य करणाऱ्या ४० गुणवंत व्यक्तींना राजभवन येथे 'गौरव श्री सन्मान २०२३' प्रदान करण्यात आले. मैत्री पीस फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्याला फाउंडेशनचे अध्यक्ष बौद्ध भिक्खू सुरजित बरुआ, संगीतकार अनू मलिक व बुद्धांजली आयुर्वेदचे कैलाश मासूम प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी संगीतकार अनू मलिक, अभिनेते राजपाल यादव, उद्योजक अजय हरिनाथ सिंह, डॉ. प्रसन्न पाटणकर, सम्बुद्ध धर, सचिन साळुंके, दीपक बरगे, सुनील निखार, परवेझ लकडावाला आदींना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Comments
Add Comment