तर कोकण विभागात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे ६० मतांनी आघाडीवर
मुंबई : आज राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. यात नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागात शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
सगळ्या राज्याच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. दरम्यान मविआ आणि भाजप यांच्याकडून विजयाचा दावा केला जात असून आज दुपारपर्यंत या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचे चित्र स्पष्ट होईल.
➡️ नाशिक मतदार संघात पहिल्या १००० मतपत्रिकेत सत्यजित तांबे यांना ८५२ मते मिळाली असून शुभांगी पाटील यांना अवघी १४८ मते मिळाली आहेत.
➡️ कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे ६० मतांनी आघाडीवर असून शेकाप आघाडीचे बाळाराम पाटील पिछाडीवर आहेत.