पिस्तूल सापडल्यास दहा हजार, कोयता बाळगणार्याला पकडल्यास तीन हजार
याशिवाय वाँटेड, फरार आरोपींना पकडल्यास देखील दिले जाणार बक्षीस
पुणे : पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसात कोयता गँगने धूमाकुळ घातला असून फायरींगच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. शहरात गुंडांचा वाढता धूमाकुळ पाहता पोलिसांसमोर आव्हान उभे राहीले असून या गुंडांना पकडणार्या पोलिसांवर आता बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे.
यानुसार पिस्तूल जवळ बाळगणार्या गुंडाला पकडल्यास दहा हजार, तर कोयता बाळगणार्याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय वाँटेड, फरार आरोपींना पकडल्यास देखील हजारो रुपयांची बक्षीसे देण्यात येणार असून पुणे पोलिसांची ही बक्षीस योजना चांगलीच चर्चेत आली आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयातील पश्चिम आणि पुर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तांनी ही बक्षीस योजना जाहीर केली आहे.
अशी आहे बक्षिसांची योजना
- शस्त्र अधिनियम कलम ३, २५ साठी दहा हजार रुपये
- शस्त्र अधिनियम कलम ४, २५ साठी तीन हजार रुपये
- फरारी आरोपीस पकडल्यास १० हजार रुपये
- पाहीजे आरोपी पकडल्यास ५ हजार रुपये
- मोक्कातील आरोपी पकडल्यास ५ हजार रुपये
- एमपीडीएतील आरोपी पकडल्यास ५ हजार रुपये