Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीशाहिद कपूरसोबत चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीचे आज लग्न

शाहिद कपूरसोबत चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्रीचे आज लग्न

मुंबई: शाहिद कपूरसोबत सिनेमात काम केलेली अभिनेत्री आज बोहल्यावर चढणार आहे. आज पार पडलेल्या हळदी समारंभात तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत धम्माल डान्स केला. हळदीचा समारंभातील या अभिनेत्रीच्या डान्सचा व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.

शाहिद कपूरसोबत कबीर सिंग या सिनेमात काम केलेल्या आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या वनिता खरात आणि सुमितच्या हळदी समारंभासाचे फोटो, व्हिडीओ पर्पल मराठी या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये वनिता व सुमित धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येत आहे.

वनिता व सुमितने हळदीसाठी खास पांढऱ्या रंगाचा अन् पिवळ्या फुलांची डिझाइन असलेला ड्रेस घातला होता. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांनीही त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. कालच वनिताच्या मेहेंदी कार्यक्रम पार पडला. मेहेंदी सोहळ्यानंतर वनिताने नववधूचा हिरवा चुडा भरलेल्या हाताचा फोटो शेअर केला होता.
वनिताचा होणारा नवरा सुमित व्हिडीओ क्रिएटर तसेच ब्लॉगर आहे. त्याला पर्यटनाची प्रचंड आवड आहे. एका सहलीच्यावेळी वनिता व सुमित एकमेकांना भेटले. आधीपासूनच मित्र असलेल्या वनिता व सुमितची नंतर घट्ट मैत्री झाली. लॉकडाऊनमध्ये ते एकत्र लुडोही खेळायचे. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झाल्यानंतर वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता ते विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Purple Marathi (@purple_marathi)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -