Wednesday, August 13, 2025

बदलापूर बस आगारात महिलांसाठी स्वच्छतागृहच नाही

बदलापूर बस आगारात महिलांसाठी स्वच्छतागृहच नाही

महिला आगरव्यवस्थापकांच्या स्थानकातच महिला उपेक्षित



  • रविंद्र थोरात


बदलापूर : एकीकडे सरकार विविध योजनांसाठी करोडो रुपये खर्च करत असताना राज्यातल्या एसटी महामंडळाच्या आगारात शौचालयांची दुरवस्था झाली आहे. बदलापुर बस आगारात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहच नसल्याने येथे महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.


सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे असणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. बदलापुरात शेकडो महिला कामासाठी बाहेर पडतात पण बदलापूर स्थानकात महिलांसाठी स्वच्छतागृह का बांधण्यात आले नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. बस स्थानकात बस वाहक व चालक महिला, शालेय विद्यार्थिनी, दिव्यांग महिला, ज्येष्ठ महिला, महिला पोलीस, समाजसेविका, मजूरी करणाऱ्या स्त्रियांसह इतर महिला प्रवासी बस स्थानकात स्वच्छतागृह नसल्याने मोठा त्रास सहन करत आहेत. अनेक महिलांना बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर आडोसा घेऊन नैसर्गिक विधी करावा लागतो.



'स्वच्छतागृहाच प्रस्ताव विचाराधीन'


आमचे बांधकाम खाते वेगळे आहे. बदलापूर बसस्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाच प्रस्ताव दिलेला असून विचाराधीन असल्याचे आगरव्यवस्थापक मानसी शेळके यांनी प्रहारला सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >