
७ लाखापर्यंत उत्पन्न असणा-यांना आयकरात सूट
नवी दिल्ली : आयकर मर्यादा वाढवण्यात आली असून आता ७ लाखापर्यंत उत्पन्न असणा-यांना आयकरातून सूट देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना ही महत्वाची घोषणा केली. यामुळे सीतारामण यांनी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे.
त्याचबरोबर निर्मला सीतारामण यांनी नव्या टॅक्स स्लॅबमध्ये देखील मोठा दिलासा दिला आहे. या नव्या स्लॅबनुसार आता २.५० लाख रुपयांहून ७ लाख रुपये करण्यात आलं आहे.
वैयक्तिक टॅक्स स्लॅबमध्ये नवे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, ०-३ लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यानंतर ३-६ लाखांपर्यंत ५ टक्के तर ६-९ लाखांपर्यंत १० टक्के, ९-१२ लाखांपर्यंत १५ टक्के त्यानंतर १२-१५ लाखांसाठी २० टक्के आणि १५ लाखांच्यावर ३० टक्के अशी नवी कर रचना असणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1620678098697216000