नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यावेळी सीतारमण यांनी कर्ज, करात सवलत, शेतकरी, व्यावसायिक, महागाई अशा महत्वाच्या क्षेत्रांविषयी घोषणा केल्या. तसेच, अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त होणार याबद्दलही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
स्वस्त
- टीव्ही
- मोबाईल
- इलेक्ट्रीक वाहने
- कॅमेरा लेन्स
- सायकल
- खेळणी
- बॅटरी ऑपरेडेट वस्तू
- हि-याचे दागिणे
- बायोगॅसशी संबंधित वस्तू
- लिथियम
महाग
- छत्री
- सिगारेट
- सोन्याचे दागिने
- चांदीची भांडी आणि दागिने
- प्लॅटिनम
- विदेशी किचन चिमणी