Sunday, October 26, 2025
Happy Diwali

आरोग्य केंद्रात डॉक्टर अनुपस्थित, आरोग्यसेवेची वानवा...आयुक्तांनी घेतलं फैलावर

आरोग्य केंद्रात डॉक्टर अनुपस्थित, आरोग्यसेवेची वानवा...आयुक्तांनी घेतलं फैलावर

ठाणे : ठाणे महानगर पालिका आरोग्य केंद्रात स्त्रीरोगतज्ज्ञ व इतर डॉक्टरांची अनुपस्थिती, आरोग्य केंद्राची दुरावस्था, आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आदी बाबी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर वागळे यांच्या निदर्शनास आल्या आहेत. आयुक्तांनी वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर आरोग्यकेंद्र व मीनाताई ठाकरे प्रसुतीगृहाला अचानक भेट दिली. यावेळी हे लक्षात येताच याबाबत संबंधितांना त्यांनी खडे बोल सुनावले.

ठाणे महानगरपालिकेच्या सर्व माता बाल रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया विभाग कार्यान्वित करणे गरजेचे आहे या सोबतच सर्व ठिकाणी फक्त इलेक्टिव्ह सिझेरियन नव्हे तर तर इमर्जन्सी सिझेरियनची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देत असतानाच माता बाल केंद्रामधील स्त्रीरोगतज्ज्ञांची पूर्ण वेळ उपस्थिती अनिवार्य असलीच पाहिजे, यासाठी अतिरिक्त स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञांची आवश्यकता असेल तर ते उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

यावेळी संपूर्ण आरोग्य केंद्रातील सोनोग्राफी कक्ष, शस्त्रक्रिया विभागाची पाहणी करीत असताना लॉबीमध्ये वापरात नसलेले बेडस् व इतर साहित्य तातडीने हटवून लॉबी तात्काळ मोकळी करण्यात यावी. तसेच सद्यस्थितीत आरोग्‌यकेंद्रातील ओपीडी ही पहिल्या मजल्यावर असून ती तळमजल्यावर करणेबाबत कार्यवाही करावी जेणेकरुन गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीस्कर होईल असेही त्यांनी नमूद केले. प्रसुतीगृहात नावनोंदणीसाठी येणाऱ्या गरोगर मातांची नोंदणी आठवड्यातून एक दिवस न करता दररोज सुरू राहील या दृष्टीने नियोजन करावे या बाबत सूचना दिल्या.

संपूर्ण आरोग्य केंद्रातील आवश्यक स्थापत्य कामे करुन उपलब्ध कक्ष नीटनेटके व स्वच्छ राहतील यासाठी देखील योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच रुग्णालयातील गळती काढणे, प्लास्टर, विद्युतीकरण आदी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधितांना यावेळी बांगर यांनी दिले.

पुर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ दुपारी बारा वाजता गायब

महापालिका कार्यक्षेत्रात गरीब व आर्थिक घटकातील नागरिकांना वेळेवर व मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विभागनिहाय आरोग्यकेंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. यापैकी शिवाजीनगर आरोग्य केंद्राची पाहणी आयुक्तांनी पाहणी केली असता दैनंदिन सेवेत असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ दुपारी बारा वाजता दुसऱ्या आरोग्य केंद्रात गेल्याची बाब निदर्शनास आली. प्रसुतीगृहामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ पूर्ण वेळ उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे नमूद करीत यासाठी संपूर्ण नियोजन करुन प्रसुतीगृहामध्ये व आरोग्यकेंद्रात डॉक्टरांची उपस्थिती पूर्णवेळ राहील यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

Comments
Add Comment