महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन
अंबरनाथ : शासकीय जमिनीवरील शर्तभंग नियमानुकूल कालावधी वाढवून देण्यासाठी अंबरनाथ येथील रहिवाशांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या माध्यमातून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.
अंबरनाथ मधील सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्था व डी. डी. स्कीम–१५ मधिल सदनिका व भूखंड धारकांना निवासी प्रयोजनार्थ वाटप करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील आढळून आलेले शर्तभंग नियमानुकूल करणेबाबत घेतलेल्या धोरणात्मक शासन निर्णयाचा कालावधी वाढवून देण्यात यावा तसेच भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकिय जमिनींचा धारणाधिकार रुपांतरीत (भोगवटादार वर्ग -१) करण्यास घातलेली बंदी उठविण्यात यावी याकरीता आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रालयात भेट घेत लेखी मागणी केली.
यावर विखे पाटील यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.