
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनीमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला आहे. या संदर्भातील फोटो ट्विट करत हे कार्यालय अनिल परब यांचेच असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी काल केला. आज या तोडलेल्या ठिकाणाची पाहणी देखील करण्यासाठी सोमय्या येणार आहेत.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1620242352660185088
अनिल परब यांचे वांद्रे येथील कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार सोमय्या यांनी लोकायुक्तांसमोर केली होती. त्यानंतर म्हाडानेही हे बांधकाम पाडण्याची नोटीस दोन वेळा परब यांना दिली होती. मात्र परब यांनी हे बांधकाम पाडले नाही. परब यांनी हे बांधकाम नियमित करण्यासाठी म्हाडाकडे प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव म्हाडाने फेटाळून लावला. त्यामुळे सोमय्या यांनी पुन्हा म्हाडाला पत्र लिहून हे बांधकाम पाडण्याची मागणी केली. त्याची दखल घेत म्हाडाने हे बांधकाम पाडल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.