Tuesday, March 17, 2026

अनिल परब यांची आमदारकी रद्द करा

अनिल परब यांची आमदारकी रद्द करा

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनीमधील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. अनिल परबांविरोधात आमचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनीही म्हाडाकडे तक्रार केली होती. त्यांचे सरकार असल्याने कारवाई झाली नव्हती. अनधिकृत कार्यालय तोडण्यात आल्यानंतर आता त्यास जबाबदार असणा-या अनिल परब यांची आमदारकी रद्द व्हावी यासाठी तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे वांद्रे परिसरातील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक ५७ आणि ५८ या ठिकाणी कार्यालय आहे. हे जनसंपर्क कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात यावे अशा आशयाची तक्रार आमचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी म्हाडाकडे केली होती. तसेच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही म्हाडाकडे पत्र देऊन पाठपुरावा केला. तसेच या प्रकरणात काही वर्षांपूर्वी किरीट सोमय्या यांनी हे कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्याची मागणी करणारी याचिका लोकायुक्तांपुढे सादर केली होती. त्यापूर्वी विलास शेगले या व्यक्तीने देखील म्हाडाकडे तक्रार करून हे बांधकाम पाडण्यात यावे अशी मागणी केली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >