
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे मुंबईतील वांद्रे पूर्व भागातील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. या पाडकामाच्या ठिकाणी किरीट सोमय्या मंगळवारी दुपारी भेट देणार आहेत.
अनिल परब यांच्या वांद्रे गांधीनगर येथे हे जनसंपर्क कार्यालय होते. त्यांचे हे कार्यालय अवैध असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या कार्यालयाच्या बांधकामाविरोधात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मंगळवारी हातोडा चालवण्यात येणार होता.
दरम्यान, त्याआधीच म्हणजे सोमवारी सोसायटी आणि परब यांच्याकडून पाडकाम करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता मंगळवारी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही म्हाडाच्या एका अधिका-याने सांगितले.