Tuesday, July 16, 2024
Homeदेशदेशात प्रबळ इच्छाशक्तीचे सरकार - राष्ट्रपती

देशात प्रबळ इच्छाशक्तीचे सरकार – राष्ट्रपती

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

नवी दिल्ली : आपल्याला आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. जो मानवी जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम आहे. जिथे गरीबी नसेल आणि मध्यमवर्ग श्रीमंत असेल. तरुणांनी काळाच्या दोन पावले पुढे व्हावे, असा भारत असावा, अशा भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना व्यक्त केल्या.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्यांदाच संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. मुर्मू यांचे आगमन होताच संपूर्ण सभागृहाने त्यांचे टेबल वाजवून स्वागत केले.

त्या पुढे म्हणाल्या की, संसदेच्या या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना मला आनंद होत आहे. काही महिन्यांपूर्वीच देशाने आपल्या स्वातंत्र्याचे ७५ वर्षे पूर्ण करून अमृतकालमध्ये प्रवेश केला. अमृतकालचा २५ वर्षांचा काळ हा स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक आणि विकसित भारत घडवण्याचा काळ आहे.

आपल्यासमोर एक युग निर्माण करण्याची संधी आहे. यासाठी १०० टक्के कार्यक्षमतेने काम करावे लागेल. आपल्याला २०४७ पर्यंत असे राष्ट्र घडवायचे आहे, ज्यात भूतकाळाचे वैभव आणि आधुनिकतेचा प्रत्येक सुवर्ण अध्याय आहे. आपल्याला स्वावलंबी भारत बनवायचा आहे. जो मानवी जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम आहे. आपल्याला हव्या असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधा देशात तयार होऊ लागल्या आहेत. आज भारतात डिजिटल नेटवर्क आहे. ज्यातून विकसित देशही प्रेरणा घेत आहेत. देशाला भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी होती, त्यातून स्वातंत्र्य मिळत आहे. आज वेगवान विकास आणि दूरगामी दृष्टी घेऊन घेतलेल्या निर्णयांसाठी देश ओळखला जात आहे. जगातील दहाव्या अर्थव्यवस्थेतून आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. येत्या २५ वर्षात विकसित भारताचा आत्मविश्वास वाढवणारा हा पाया आहे.

मी देशवासियांचे आभार मानते की, त्यांनी सलग दोन वेळा स्थिर सरकार निवडले. सरकारने राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिले. सर्जिकल स्ट्राईकपासून ते दहशतवादावर कारवाई करण्यापर्यंत, नियंत्रण रेषेपासून एलएसीपर्यंत प्रत्येक वाईट प्रयत्नाचा नायनाट करण्यात आला. कलम ३७० ते तिहेरी तलाकपर्यंत निर्णायक निर्णय घेणारे सरकार ही सरकारची ओळख बनली असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -