भाईंदर : मीरा भाईंदर शहरात राज ठाकरे यांना प्रेरित होऊन ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत १४५ विधानसभा अध्यक्ष कामगार नेते संदिप राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पेणकरपाडा परिसरातील तरुण मुलांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षात प्रवेश केला.
महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या राजकारणातील बदलाप्रमाणे आता महानगर पालिकेच्या निवडणुका जवळ येताच सर्व पक्षात नवीन प्रवेश सुरु झाले आहेत. राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी तरुणांनी राजकारणात येण्याची गरज असून मनसे नक्कीच तरुणांना संधी देणार असल्याचे संदीप राणे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मनसे महिला सेना शहर अध्यक्षा कविता वायंगणकर, महिला सेना उपशहर अध्यक्ष लक्ष्मी गाडेकर, उपशहर अध्यक्षा दृष्टी घाग, शहर सह सचिव करण कांडणगिरे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.