Wednesday, March 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेगटई कामगारांचा ‘रापी मोर्चा’ पोलिसांनी अडवला

गटई कामगारांचा ‘रापी मोर्चा’ पोलिसांनी अडवला

पोलीस आणि मोर्चेकर्‍यांमध्ये चकमक

ठाणे (प्रतिनिधी)- हुतात्मा दिनी गटई चर्मकार समाज कामगार संघटनेच्या वतीने राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला ‘रापी मोर्चा’ पोलिसांनी अडवला. त्यामुळे काही काळासाठी पोलीस आणि मोर्चेकर्‍यांमध्ये चकमक झाली. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करुन सात दिवसात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ठाणे नगर पोलिसांनी दिले.

ठाणे महानगर पालिकेने महासभेमध्ये ठराव करून चर्मकारांना गटई स्टॉल्सचे परवाने दिले आहेत. तसेच, समाज कल्याण खात्यानेही शहरातील २३८ स्टॉल्सला प्रमाणित केले आहे. हे सर्व स्टॉल्स वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत, या पद्धतीने उभे केले आहेत. ठाणे महानगर पालिका आणि राज्य शासनाच्या समाजकल्याण खात्याने प्रमाणित केलेले गटई स्टॉल हटवण्यासाठी ठाणे महानगर पालिका अधिकार्‍यांवर माजी नगरसेवक संजय वाघुले हे दबाव टाकत आहेत. त्यामुळे गटई स्टॉल्सवर कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप राजाभाऊ चव्हाण यांनी केला आहे.
त्यानुसार, सुमारे ५०० चर्मकार आपल्या कुटुंबासह या मोर्चासाठी उपस्थित होते. मात्र, थोड्याशा अंतरावरच हा मोर्चा अडविण्यात आला.

यावेळी, राजाभाऊ चव्हाण यांनी, “ हा मोर्चा कोणा पक्षाविरुद्ध किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून प्रवृत्तीच्या विरोधात आहे. केवळ दलितांना हीन लेखण्यासाठी जर कोणी चर्मकारांच्या स्टॉलवर आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आज हा मोर्चा अडवण्यात आला असला तरी हे आंदोलन थांबणार नाही”, असा इशारा दिला.

यावेळी राजकुमार मालवी, संतोष अहिरे, सुभाष अहिरे, कैलास लोंगरे, कलिराम मंडराई, गोपाल विश्वकर्मा, मनिषा चव्हाण आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -