नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात साडेसहा टक्के मतदान

  60

नाशिक : विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या नाशिक विभागासाठी आज होत असलेल्या मतदानात सकाळी पहिल्या दोन तासात साडेसहा टक्के मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.


नाशिकसह धुळे, जळगाव, अहमदनगर व नंदुरबार या पाच जिल्ह्यांच्या या विभागात हे मतदान आज होत आहे. विधान परिषदेच्या या एका जागेसाठी सोळा उमेदवार रिंगणात उतरले असून दुपारी चार वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.


पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे ३३८ मतदान केंद्र प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आले आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरलेली असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


रिंगणात असलेल्या १६ उमेदवारांपैकी एकही उमेदवार अधिकृत पक्षाचा नसला तरी काही उमेदवारांना पाठिंबा मात्र मिळाला आहे. या निवडणूक रिंगणात असलेल्या सत्यजित तांबे यांना भाजपाकडून पाठिंबा मिळेल असे वाटत होते मात्र अद्याप तशी घोषणा झाली नसली तरी शहरातील मतदान केंद्रांवर भाजपाचे पदाधिकारी तांबे यांचा प्रचार करताना दिसून येत होते.


पहिल्या दोन तासात काही प्रमाणात का होईना परंतु नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद झाली आहे.



पहिल्या दोन तासात झालेले जिल्हानिहाय मतदान


नंदुरबार - ६.१२ टक्के
धुळे - ६.५५ टक्के
जळगाव - ६.४७ टक्के
नाशिक - ५.४९ टक्के
अहमदनगर - ७.२१ टक्के

Comments
Add Comment

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत