मुरूड : मुरुड तालुक्यातील निलेश काशिनाथ खामकर यांची नऊगांव कुणबी समाज (सर्वे) विभाग अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नऊगांव कुणबी समाज (सर्वे विभाग) यांच्या नऊगांव कुणबी समाजाच्या सभागृहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारिणीच्या सभेत निलेश खामकर यांची सर्वे विभाग अध्यक्षपदी सर्वांनुमते बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र कौतुक व समाधान व्यक्त होत आहे. हरिश्चंद कांगणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत समाजाच्या विविध अडिअडचणी, समस्यांवर चर्चा, विचार-विनिमय करण्यात आला.
यावेळी समाजाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये नऊगांव कुणबी समाज (सर्वे) विभाग अध्यक्षपदी निलेश खामकर, उपाध्यक्षपदी हरिश्चंद्र कांगणे, सचिव शशिकांत बांद्रे, सहसचिव उदय महाडीक, दामोदर बांद्रे, खजिनदार संतोष पोटले, सहखजिनदार दिपक नाईक, सल्लागार म्हणून गजानन भोईर, नरेश धार्वे, सुशील खोपकर, मिलिंद महाडीक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन करुन पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.