Sunday, May 11, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

पदवी प्रमाणपत्रावरील नावे दुरुस्त करणे शक्य

पदवी प्रमाणपत्रावरील नावे दुरुस्त करणे शक्य

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावरील मराठीतील नावे दुरुस्त करण्यासाठीची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पदवी प्रमाणपत्रावरील तपशील पाहता येईल. त्यात काही चुका असल्यास त्या २३ फेब्रुवारी पूर्वी चुका दुरूस्त करून विद्यार्थ्यांना अचूक प्रमाणपत्र देण्यात येईल.


विद्यापीठाने प्रथम सत्र २०२२मध्ये घेतलेल्या पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा तपशील उपलब्ध करून दिला आहे. यासाठी मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या संकेस्थळावरच हा तपशील तपासता येऊ शकतो. ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल.


दरम्यान, सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन आपला मराठी नावाचा तपशील अचूक आहे का हे पाहावे, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी केले आहे.

Comments
Add Comment