औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये वन खात्याच्या बदलीसाठी एका व्यक्तीकडून खैरे यांचा मुलगा ऋषिकेश यांनी दोन लाख रुपये घेतल्याचे या ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. मात्र बदलीचे काम झाले नसल्याने, तो व्यक्ती पैसे परत मागत असल्याचे या ऑडीओ क्लिपमधील संभाषणात दिसून येते.
महाविकास आघाडीची सत्ता असताना हा व्यवहार झाल्याचा देखील या ऑडिओ क्लिप मधून स्पष्ट होते. विशेष म्हणजे ऋषिकेश खैरे यांनी देखील पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. पैसे देण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून ऋषी खैरे टाळाटाळ करत असल्याचे देखिल या ऑडिओ क्लिपमध्ये समोर आले आहे.
या सर्व प्रकरणावर ऋषिकेश खैरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, कोरोनाच्या आधी माझा एका मित्र त्याच्या पत्नीची बदली करण्यासाठी माझ्याकडे आला होता. त्यावेळी ठाकरे सरकार असल्याने बदली करून देऊ, असे मी त्याला सांगितले होते. पण अचानक कोरोना आला आणि त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडल्याने बदलीचे काम होऊ शकले नाही. पण त्यांचे काय पैसे माझ्याकडे असतील ते देण्यासाठी मी तयार असल्याचे ऋषिकेश खैरे म्हणाले. मात्र महाविकास आघाडीच्या काळात पैसे देऊन बदल्या केल्या जात होत्या का? या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले.
ऋषी खैरे: हॅलो
विजय: बोला भाऊ
ऋषी खैरे: कुठे आहे तू…
विजय: इकडे शेंद्राला होतो
ऋषी खैरे: आ…
विजय: शेंद्राला
ऋषी खैरे: अच्छा, काळेचा फोन आला होता, काय झाले
विजय: अरे हो ना, तुम्ही दोघेपण ह्ल्क्यातच घेऊ लागले, एवढी परेशानी चालू आहे माझी, दोन अडीच वर्षे झाले पैसे देऊन, दोन लाख रुपये..काय बोलणार आहे बरं तुम्हाला, विशाल देखील काही रिस्पॉन्स देत नाही..तुम्ही रिस्पॉन्स देऊ नाही राहिले
ऋषी खैरे: आज काय तारीख आहे, 23 तारीख आहे…पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय: आता लय वेळीस सांगितले न तुम्ही, किती वेळेस भेटलो. तेथून आता इथे आलो होतो.
ऋषी खैरे: हंड्रेड पर्सेंट होईल
विजय: तुम्हाला माहित आहे का भाऊ, मी घरातील सोने चांदी देखील मोडले आहे, आता एवढी परेशानी चालू आहे. तुम्ही लोकांनी फोन उचलले नाही, काय करायचं बरं सांगा तुम्ही..माझं काम देखील नाही झाले बदलीचे, नंतर दीड-दोन वर्षे देखील वाया गेले माझे
ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुझं काम करून देतो किंवा पैसे देतो
विजय: नै काम करूच नका, काम करून घेतो मी, आता लोकांना परत पैसे देऊन बसलो आहे मी, तिकडे बदलीसाठी
ऋषी खैरे: अच्छा दिलेले आहे का?
विजय: हो…
ऋषी खैरे: पैसे देऊन टाकतो
विजय: तुम्ही तारीख सांगा भाऊ एक फिक्स, खरच लय परेशानी चालू आहे माझी
ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय: लास्ट तारीख आठ पकडू का मी…
ऋषी खैरे: होय…
विजय: बरं ठीक आहे चालेल… (फोन कट होतो)
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…