वृत्तसंस्था (पाकिस्तान): पेशावरच्या पोलीस लाइन्स भागातील मशिदीत झालेल्या स्फोटात ३२ लोक ठार आणि १५० जखमी झाले आहेत. मृतांची आणि जखमींची संख्या वाढत आहे. पेशावरचे आयुक्त रियाझ मेहसूद यांनी याची अधिकृत माहिती दिली. दरम्यान, तेथे अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याने बचाव कार्य सुरू आहे.
या स्फोटाचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरभरात आणीबाणी लागू करण्यात आल्याचे तसेच जखमींवर तातडीने उपचार सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीती म्हटले आहे.
गर्दीने भरलेल्या या मशिदीत झालेल्या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. ही इमारत शहरातील तटबंदीच्या परिसरात आहे. पेशावरचे पोलिस प्रमुख इजाज खान यांनी आत्मघातकी बॉम्बस्फोटाची शक्यता नाकारता येत नाही असे म्हटले आहे. मशिदीच्या आत स्फोटकांच्या खुणा सापडल्याचेही त्यांनी सांगितले.
मशिदीत किमान २६० लोक होते. इमारतीचा एक भाग कोसळला होता आणि अनेक लोक त्याखाली असल्याचं समजतं असल्याचंही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.
Pakistan | At least 50 people were injured when a “suicide attacker” blew himself up in a mosque located in Peshawar's Police Lines area during prayers: Geo News
— ANI (@ANI) January 30, 2023