मुंबई: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या स्वयंघोषित संत आसाराम बापूच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. आसाराम बापू हा आणखी एका बलात्काराच्या प्रकरणाता दोषी आढळला आहे. गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून उद्या आसाराम बापूला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
या आधी केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी जोधपूर येथील तुरुंगात आसाराम बापू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टात त्याने जामीन अर्जही दाखल केला होता. मात्र, कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला होता.
२०१३ मध्ये सूरतमधील एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर लावण्यात आला होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामशिवाय, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या आरोपी होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी असल्याचे जाहीर केले. मात्र, शिक्षा उद्या, मंगळवारी सुनावणार असल्याचे जाहीर केले.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…