जव्हार: प्रगती प्रतिष्ठान संचालित निलेश ल. मुर्डश्वर कर्णबधिर विद्यालयाचे वार्षिक स्नेसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. कर्णबधिर विदयार्थ्यांनी सामूहिक, वैयक्तिक नृत्य, नाटिका, विविध वेशभूषा असे कार्यक्रम सादर केले.
यावेळी ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद पाटील, संस्थेच्या माजी सचिव सुनंदाताई पटवर्धन, पॅनासॉनिक कंपनीचे सी. एस. आर. विभागाचे प्रमुख किरण मोरे, जव्हारच्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समीर वाठारकर तसेच मर्चंट नागरी पतसंस्थेचे संचालक प्रशांत ओक उपस्थित होते.
जागतिक दिव्यांग दिना निमित्त आयोजित विविध स्पर्धाचे तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.