ठाणे: कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उद्या सोमवार ३० जानेवारी रोजी सकाळी आठ ते चार या कालावधीत मतदान होणार आहे.
या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षक मतदारांनाच मतदानाचा हक्क असणार आहे. कोकण विभाग शिक्षक संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी पाच जिल्हे समाविष्ट आहेत. या पाच जिल्ह्यातून मतदान अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले आहेत. मतदान मतपत्रिकेवर होणार असून त्यावर उमेदवाराच्या नावासमोर असलेल्या पसंतीक्रमाच्या शाईच्या पेनानेच मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे.
मतदान संपल्या नंतर मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांचे मार्फत सर्व मतपेट्या पोलिस बंदोबस्तात जिल्हा मुख्यालय या ठिकाणी आणण्यात येणार आहेत. त्या नंतर त्या आगरीकोळी संस्कृती भवन सेक्टर २४ पामबीच रोड नेरूळ नवीमुंबई या ठिकाणी स्ट्राँग रूम मध्ये जमा करण्यात येणार आहे