Monday, October 20, 2025
Happy Diwali

प्राणी कल्याण सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम

प्राणी कल्याण सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम
ठाणे:  ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उद्या ३० जानेवारीला ६ ते ८ वीच्या निवडक विद्यार्थ्यांची येऊर येथील गोशाळेत भेट आयोजित केली आहे. जीवजंतू कल्याण दिवस आणि प्राणी कल्याण पंधरवडा सप्ताहाच्या समारोपाच्या निमित्ताने सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. श्री पशुरक्षक मंडल ट्रस्ट येऊर, येथे या विद्यार्थ्यांना गोवंश, म्हसवंश जनावरांकडुन प्राप्त दुध व पदार्थांंची माहिती दिली जाईल तसेच गोशाळेमध्ये तयार होणाऱ्या बायोगॅस, विविध औषधे, नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली उत्पादने, अगरबत्ती आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे. कुत्रा किंवा साप चावल्यानंतर करावयाचे प्राथमिक उपचार, प्लास्टिक उत्पादनांचा पक्षी प्राणी यांच्यावर होत असलेला परिणाम याचीही माहिती दिली जाईल. तसेच भटक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या व भटके कुत्रे दत्तक घेणाऱ्या नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment