विजय मांडे
कर्जत : महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना यांच्या रायगड जिल्ह्यातील सदस्यांचा मेळावा आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत रायगड जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातील शासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना यांचा रायगड जिल्हा मेळावा आणि कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा अधिकारी डॉ़ सुधाकर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळावा आणि कार्यशाळेसाठी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती.
तसेच जिल्हा परिषदेतील आरोग्यवर्धिनी सल्लागार डॉ़ सागर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे अध्यक्ष डॉ. रूपेश सोनावळे, कोषाध्यक्ष डॉ. महेश मोकल आदी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आरोग्य उपकेंद्रमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या डॉ़ स्नेहा कस्तुरे यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या आयोजित कार्यशाळेत समुदाय आरोग्य अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ प्रमोद गवई, डॉ. अशोक कटारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील, डॉ. राजाराम भोसले, डॉ. रोशन पाटील हे उपस्थित होते.
रुग्णांना उत्तम प्रकारची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता यावी आणि काम करतांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विचारविनिमय या बैठकीत करण्यात आला. या मेळाव्याला संघटनेचे अमोल खैरनार, तसेच तालुका आरोग्य अधिकारी पेण येथील डॉ. अपर्णा पवार, महाड येथील डॉ. नितीन बावडेकर, उरण येथील डॉ. ईटकरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व समुदाय अधिकारी उपस्थित होते.