Sunday, July 14, 2024
Homeक्रीडानोव्हाक जोकोविच ठरला किंग!

नोव्हाक जोकोविच ठरला किंग!

२२वे ग्रँडस्लॅम जिंकत रचला इतिहास, नदालशी केली बरोबरी

मेलबर्न (वृत्तसंस्था) : टेनिसचा स्टार खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने त्याच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. ऑस्ट्रेलिया ओपनच्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये त्याने ग्रीसच्या स्टिफानोस त्सिस्तिपास याचा पराभव केला आहे. नोव्हाकने स्टिफनोस याला ६ -३, ७-४ आणि ७ – ६ अशा फरकाने पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपन ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे यासोबत त्याने स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालच्या ग्रँडस्लॅमच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. नोव्हेकने ऑस्ट्रेलिया ओपन जिंकल्यामुळे त्याच्याकडील ग्रँडस्लॅमची संख्या २२ झाली आहे. त्याने नदालच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलिया ओपनमधील अंतिम सामना आज नोव्हाक जोकोविच आणि स्टेफानोस सित्सिपास यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात सर्बियाचा अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत जोकोविचने ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपासचा पराभव केला. जोकोविचने २ तास ५६ मिनिटे चाललेला हा सामना ६-३, ७-६, ७-५ असा जिंकला. या विजयासह जोकोविच एटीपी क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा पुरुष खेळाडू बनला आहे.

विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने शानदार सुरुवात केली आणि पहिला सेट ६-३ आणि दुसरा सेट ७-६ असा जिंकला. आता दुसरा सेट जिंकून जोकोविच हा सामना जिंकेल असे वाटत होते आणि तसेच झाले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा २४ वर्षीय सित्सिपास हा दुसरा सर्वात तरुण पुरुष खेळाडू आहे. त्याआधी जोकोविचने २०११ मध्ये वयाच्या २३व्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती. जोकोविच आणि त्सित्सिपासमध्ये जो जेतेपद पटकावेल तो एटीपी रँकिंगमध्ये नंबर वन होईल आणि हा सामना जिंकून शेवटी जोकोविच विजयी ठरला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -