Sunday, October 26, 2025
Happy Diwali

'शेवंता' पोहोचली हळदी-कुंकु कार्यक्रमाला, दिला प्रेमळ सल्ला

'शेवंता' पोहोचली हळदी-कुंकु कार्यक्रमाला, दिला प्रेमळ सल्ला

मुरबाड: प्रत्येक स्त्रीने तिच्या करिअरमध्ये हार न मानता ताकदीने लढा दिला पाहिजे असा स्फुर्तिदायक अन् प्रेमळ सल्ला 'मराठी बिग बॉक्स' व रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने दिला. मुरबाड समाज हॉल येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दिव्य हळदीकुंकू समारंभाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, मी सुद्धा 'मराठी बिग बॉक्स' मध्ये काम करताना ठरवलं होतं की कधीही हार मानायची नाही, त्यामुळे तुम्हीही हार मानू नका असे आवाहन अपुर्वा नेमळेकर यांनी केले. सभागृहातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती पाहून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला. या हळदी कुंकू कार्यक्रमात जवळपास बाराशे महिलांना बाराशे साड्या वाटप करण्यात आल्या.

यावेळी व्यासपीठावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील, पुष्पलता पाटील, ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, डॉ. भारती बोटे, शुभांगी पवार, उपजिल्हा प्रमुख रामभाऊ दळवी, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन प्रकाश पवार, तालुका प्रमुख कांतिलाल कंटे, पंचायत सदस्य अनिल देसले, तालुका सचिव प्रा. धनाजी दळवी, नगरसेवक विनोद नार्वेकर, अक्षय रोठे, महिला संघटक रेखा ईसामे, जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावथे॔, पंचायत समिती सदस्य पद्मा पवार, योगिता विशे, त्यांच्यासह या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या समारंभात जवळपास बाराशे महिलांनी सहभाग घेतला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >