
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ सुखोई-३० आणि मिराज २००० अशी दोन विमाने कोसळली. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते. जिथे सराव सुरू होता. तर राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात वायू सेनेच्या विमानाचा अपघात झाला. भरतपूरचे जिल्हाधिकारी अलोक रंजन यांनी दुजोरा दिला आहे. तिन्ही घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
भरतपूरच्या उचैन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुखोई-३० आणि मिराज २००० अशी दोन विमाने कोसळली. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
https://twitter.com/ANI/status/1619213408439767040
पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. परंतु जिवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही.
https://twitter.com/ANI/status/1619214710003630080