Saturday, June 14, 2025

पहाटेचा शपथविधी आणि वंचित बाबत शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले...

पहाटेचा शपथविधी आणि वंचित बाबत शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले...

कोल्हापूर : आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेससोबत एकत्र आहोत, आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत कोणतीही चर्चा केलेली नाही. ठाकरे गट आणि वंचित यांच्या चर्चेत आम्ही कुठेही नव्हतो. आमच्या ज्या चर्चा झाल्या त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जावे, अशी आमची मानसिकता आहे. तो प्रयत्न आम्ही सुरू ठेवणार आहोत, असे वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली महाविकास आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट केली.


वंचित बहुजन आघाडीशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. तुमच्यावरून ठाकरे गट आणि आंबेडकर यांच्यात वाद असल्याचे चित्र आहे, यासंदर्भात शरद पवार यांना विचारणा करण्यात आली असता पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, त्या दोघात वाद आहे की नाही, हे मला माहिती नाही.



पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या वक्तव्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. यावर प्रश्न केला असता पवार म्हणाले, पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्ष होऊन गेली आहेत तो प्रश्न आता कशाला काढायचा, असे उत्तर पवारांनी दिले.

Comments
Add Comment