Sunday, September 14, 2025

रिक्षा मीटर रिकेलिब्रशनचा विलंब दंड रद्द होणार- खा. श्रीकांत शिंदे

रिक्षा मीटर रिकेलिब्रशनचा विलंब दंड रद्द होणार- खा. श्रीकांत शिंदे

कल्याण : रिक्षा मीटर रिकेलिब्रिशन मुदत वाढवुन विलंब दंड रद्द करण्यात यावा या मागणीसाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ वतीने कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. रिक्षा मिटर रिकेलिब्रेशनसाठी प्रतिदिन असलेला ५० रुपये दंड रद्द करणे. तसेच त्याची मुदत वाढ यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकण रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष व पदाधिकारी यांचे म्हणणे लक्षात घेऊन मीटर रिकेलिब्रिशन दंड रद्द करण्यात येईल तसेच रिकेलिब्रिशनची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवून देण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्यासोबत संतोष नवले, सुबल डे, जॉन कॅलिमिनो, नुर जमादार, विजय डफळ, सुनिल मोरे, निलेश रसाळ, संजय बागवे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment