Tuesday, September 16, 2025

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पुरस्कार आशा बर्ग यांना जाहीर

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पुरस्कार आशा बर्ग यांना जाहीर

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार आशा बर्ग यांना शनिवारी घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार येत्या १० मार्च रोजी नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिरामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड गोदा गौरव आणि जनस्थान असे दोन पुरस्कार दिले जातात. यावर्षी जनस्थान पुरस्काराचे १७ वे वर्ष आहे. याआधी विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, मधु मंगेश कर्णिक आदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा