ठाणे : एकीकडे मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे घडविण्यासाठी ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर स्वच्छतेवर मोठा भर दिल्याचे दिसत असताना दुसरीकडे ठामपाच्याच हद्दीत असलेल्या दिवा प्रभाग समितीचे सफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
दिव्यातील मातोश्री संकुलाच्या दारात ओरसिट अपार्टमेंटच्या मागील बाजूस रस्त्यावर गेली अनेक दिवस रस्त्यातच कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त कचरा साचल्याने रहिवाशांना नाक दाबून घाणीतून वाट काढावी लागत आहे.
अनेक वेळा याबाबत तक्रारी करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रहिवाशांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी मातोश्री संकुलातील रहिवाशांनी केली आहे.
दिव्यातील मातोश्री नगर येथील रस्त्यावर लोक घनकचरा टाकत आहे याबद्दल न्युज आपण पेपर मध्ये टाकली, पण ह्याची दुसरी बाजू पडताळून पहावी, माजी उपमहापौर मा. रमाकांत मढवी साहेब तसेच दिव्यातील सर्व नगरसेवक निधीतून येथील रोड सिमेंट काँक्रीट करण्यात आला आहे. ह्यापूर्वी या रोडवरून कोणीही जाऊ शकत नव्हते. तसेच मातोश्री नगर मागील चाळीतील लोक येथे कचरा टाकत असून सतत तीन-चार वेळा कचरा साफ करण्यात आला आहे. लोकांना अडवूनही लोक कचरा टाकत आहेत. उलट उत्तरे देत आहेत. तिथे जवळ लहान मुलांचे क्लास चालू असून 50 – 60 लहान मुलं तिथे येतात. सकाळी 7.30 am वाजता ठाणे महानगरपालिका घनकचरा गाडी येते, तरी पण लवकर कामावर जाणारे लोक येथे कचरा टाकत आहेत. ह्याला जबाबदार कोण? येथे कचरा टाकू नये म्हणून सतत साफसफाई करून तसेच ग्रुपवर लोक विनंती करत आहेत, तरीही काही लोक सुधारत नाहीत. उलट उत्तरे देऊन पुढे जातात. अशा लोकांचे करायचे काय? ह्याबद्दल आपण स्वतः येऊन उलट पडताळणी करावी, ही विनंती.