ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाची क्लिप त्यांनी व्हायरल केल्याने ठाण्यात खळबळ माजली आहे.
कळवा, मुंब्य्रातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याच्या सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना दम भरल्याचा ऑडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर त्यांनीच व्हायरल केला आहे. कारवाई टाळण्यासाठी तुम्ही पैसे घेऊन खिशात भरता आणि तुमचे नाव लपवून मला बदनाम करता, असा गंभीर आरोपही त्यांनी केल्याचे या क्लिपमध्ये दिसत आहे.
सध्या कळवा, खारेगावात २९ बांधकामे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी केलेला आरोप धक्कादायक मानला जात आहे. रोहीदास पाटील यांच्याकडून तुम्ही २० लाख घेतले, असा गंभीर आरोपही त्यांनी यात केल्याचे दिसत आहे. हे चुकीचे आरोप असल्याचे ठाणेकर यांनी केल्याचे दिसत आहे. तर ज्याने पैसे दिले तो माणूस समोर उभा करु का? असा सवालही आव्हाड यांनी केला. या प्रकरणात उच्च न्यायालयात जाईन, असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…