Monday, July 22, 2024
Homeमहत्वाची बातमीमुलांच्या हातात मोबाईल देताय, तर काळजी घ्या!

मुलांच्या हातात मोबाईल देताय, तर काळजी घ्या!

‘मोबाईल ॲप’ पाहून नागपूरमधील एका १२ वर्षीय मुलाने लावला गळफास

नागपूर : मोबाईलमधील ‘ॲप’ बघून त्यानुसार कृती करण्याच्या नादात नागपूरमधील एका १२ वर्षीय मुलाने ओढणीने गळफास घेत जीव गमावला.

अग्रण्य सचिन बारापात्रे (वय १२ रा. सोमवारी क्वार्टर) असे या मुलाचे नाव आहे. तो अजनीतील केंद्रीय विद्यालयात आठवी इयत्तेत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास वडील काही कामानिमित्त बाहेर तर आई घरकामात व्यस्त होती. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास टेरेसवर असलेल्या लाकडी शिडीला अग्रण्य हा ओढणीने लटकला असल्याचे बाजुला असलेल्या इमारतीमधील नागरिकांना आढळला. याची माहिती त्यांनी दिल्यानंतर छतावर जाऊन बघितले तेव्हा तो ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळला.

दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की, अग्रण्यला मोबाईलचे वेड होते. त्याने आईच्या मोबाईलमध्ये अनेक ॲप डाऊनलोड केले होते. त्यापैकीच एका ॲपमध्ये गळ्यात दोर लटकवून तो कसा काढायचा याबाबतची माहिती तो सातत्याने बघत होता. त्यातूनच बुधवारी त्याने तसा प्रयत्न केल्याने त्यातून लागलेल्या गळफासात त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अग्रण्यची आई गृहिणी असून त्याचे वडील इलेक्ट्रिशियनचे काम करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -