Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली : हिंगोली येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयातील प्राचार्यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यासह ४० जणांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे. यात पाच प्राध्यापकांचाही समावेश आहे.


आमदार संतोष बांगर यांनी १८ जानेवारी रोजी दुपारी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना मारहाण केली होती. मात्र, या घटनेनंतर तब्बल १० दिवसांनी प्राचार्यांनी तक्रार दिली. त्यामुळे १० दिवसांनंतर दाखल झालेला गुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.


या महाविद्यालयातील प्राध्यापकांसह महिला कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांच्याकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आमदार संतोष बांगर हे १८ जानेवारी रोजी महाविद्यालयात गेले असता महिला प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच मांडला होता. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्यास मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला राजकीय वळण लागले होते.


या प्रकरणात आज पहाटे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक मगन पवार पुढील तपास करीत आहेत.

Comments
Add Comment