Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीरुग्णालयाला लागलेल्या आगीत डॉक्टरसह ६ जणांचा मृत्यू

रुग्णालयाला लागलेल्या आगीत डॉक्टरसह ६ जणांचा मृत्यू

धनबाद : झारखंडमधील धनबाद येथील हाजरा क्लिनिक आणि हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री एक वाजता आग लागली. यामध्ये पहिल्या मजल्यावर रहाणा-या ६ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी सर्वजण झोपलेले होते. एका डॉक्टरचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी ते पाण्याच्या टबमध्ये बसले असावे, असे सांगितले जात आहे.

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र प्राथमिक तपासानंतर ही आग स्टोअर रूममधून लागली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आग लागल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. डॉक्टर खिडकीतून स्वत:ला वाचवण्याची विनंती करत आहेत.

हॉस्पिटलचे नाव हाजरा क्लिनिक आणि हॉस्पिटल आहे. हे धनबादच्या बँक मोड पोलीस स्टेशन परिसरात टेलिफोन एक्सचेंज रोडवर आहे. डॉक्टर त्यांच्या कुटुंबासह क्लिनिकच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. अपघातात डॉक्टर दाम्पत्य, त्यांची मोलकरीण, डॉ. हाजरा यांच्या पुतण्यासह ६ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. सर्व मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमधून बाहेर काढण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -