Thursday, July 18, 2024
Homeमनोरंजनजिथे तिथे एकच चर्चा...‘३६ गुणी जोडी’ची

जिथे तिथे एकच चर्चा…‘३६ गुणी जोडी’ची

मुंबई: ३६ गुणी जोडी… या नव्या मालिकेच्या कलाकारांसोबत या ३६ इन्फ्ल्यूएंसर्स (influencer)नी एकापेक्षा एक भन्नाट रिल्स बनवले असून, सोशल मीडियावर या ३६ रील्सची चर्चा सध्या पाहायला मिळते. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता. वेदांत आणि अमूल्या या अगदीच एकमेकांपासून वेगळया असणाऱ्या दोन व्यक्तींची ही कथा आहे… वेगळे विचार, वेगळ्या सवयी, वेगळी मते जेव्हा एकत्र येतात, तेव्हा काय धमाल होते… याची ही गोष्ट आहे… वेदांतची भूमिका अभिनेता आयुष संजीव, तर अमूल्या ही भूमिका अभिनेत्री अनुष्का सरकटे करते आहे…

झी मराठीने या मालिकेच्या प्रमोशनसाठी या मालिकेच्या शीर्षकाचा छान वापर करून ३६ इन्फ्ल्यूएंसरना एकत्र आणण्याचे काम केले आहे. ही दोन युवा व्यक्तींच्या परस्परविरोधी विचारांची गोष्ट असल्याने युवा पिढीला ही गोष्ट नक्की आवडेल. सध्या युवकांमध्ये असणारे रील्सचे क्रेझ लक्षात घेता, ही भन्नाट कल्पना झी मराठीने आपल्या सोशल मीडियावर राबवलेली दिसून येते. ज्याला झी मराठीच्या प्रेक्षकांकडून भन्नाट प्रतिसाद मिळताना दिसतोय.

छोटे आणि सोपे असे हे इंस्टाग्राम रील्स सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ३६ इन्फ्ल्यूएंसर आपल्या वेगवेगळया शैलीत अमूल्या आणि वेदांतचं नातं प्रेक्षकांसमोर मांडताना दिसत आहेत. एकूणच या मालिकेला घेऊन प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -