
मुंबई: पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकर्पण केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोने अवघ्या आठड्याभरात तब्बल १० लाख लोकांनी प्रवास केला आहे. तर गेल्यावर्षी सुरु झालेल्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोने १० महिन्यांत १० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मेट्रो 2A आणि ७ चे १९ जानेवारी रोजी लोकार्पण केले होते. त्यानंतर २० जानेवारीला सुरु झालेल्या या मेट्रोने आतापर्यंत तब्बल १० लाख प्रवाशांनी आहे. मेट्रो लाईन 2A डीएन नगर अंधेरी ते दहिसरपर्यंत धावते. तर, लाईन ७ दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वपर्यंत धावते. या दोन्ही मेट्रो लाईन एकत्रितपणे, साधारण ३५ किमीचा पल्ला पार करतात. यामध्ये साधारण एकूण ३० एलिव्हेटेड स्टेशनचा समावेश आहे.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. आरे ते डहाणूकरवाडी दरम्यान हा पहिला टप्पा करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत १० लाख प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला आहे.
या दोन्ही मेट्रो मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाल्या असून मेट्रो मार्ग १ सोबत जोडल्या गेल्या आहेत. ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात पहिले मेट्रो नेटवर्क तयार झाले आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिका, मेट्रो 1 च्या माध्यमातून रेल्वे मार्गाशी सहज जोडले गेल्याने लाखो मुंबईकरांना या मेट्रोचा फायदा झाला आहे.
‘मुंबई वन कार्ड’ द्वारे 'या' सुविधा
मेट्रो 2A आणि 7 च्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुंबई वन कार्ड’ लाँच करण्यात आले. मेट्रोने प्रवास करणारे प्रवासी हे कार्ड वापरून देशाच्या कोणत्याही भागात मेट्रोचा लाभ घेऊ शकतात. या कार्डाचा वापर मेट्रो, बेस्ट बसची तिकिटे खरेदी करण्यासाठीही केला जाऊ शकतो. मेट्रोच्या तिकीट खिडक्यांवर हे कार्ड उपलब्ध आहेत. यात १०० ते १ हजार रुपयांचे रिचार्ज करता येते. हे कार्ड ट्रेनमध्ये तसेच बसमध्ये वापरता येते. एवढेच नाही तर मुंबईकर शॉपिंगसाठीही मुंबई वन कार्डचा वापर करू शकतात.