Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीविंचूर गावाने घेतली तंबाखू मुक्त गाव निर्मितीची शपथ

विंचूर गावाने घेतली तंबाखू मुक्त गाव निर्मितीची शपथ

विंचूर : नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील गावाने वसंत पंचमी आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत संपूर्ण गाव तंबाखू मुक्त निर्मितीची शपथ घेतली.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, विंचूर ग्रामपंचायत सरपंच सचिन दरेकर, स्थानिक सल्लागार समिती सदस्य जगदीश जेऊघाले, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, तसेच सोमनाथ निकम, ज्ञानेश्वर गाडे, अमजद पठाण, पंढरीनाथ जेऊघाले, विनायक जेऊघाले, शंकरराव दरेकर, किशोर दरेकर, दिनकर चव्हाण, राजाभाऊ दरेकर, गंगाधर गोरे, संतोष जाधव, दिलीप चव्हाण, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रविण ढवण, एन. पी. गवळी, एस. के. आहेर, सी. जी. बागुल, पत्रकार सुनील क्षिरसागर, नितीन गायकवाड, दत्तात्रय दरेकर, आरती जाधव, स्वाती धात्रक, मालती जाधव तसेच विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, मान्यवर, माजी सेवक व माजी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन संस्थेचे लाईफ मेंबर आर. के. चांदे व उपशिक्षक व्ही. सी. भोसले यांनी केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमनबाई दरेकर, शोभा बोराडे, सुवर्णा गोरे, मीरा गोरे, मंगल खैरे, दत्तात्रय व्यवहारे, संतोष जाधव, राजेंद्र मोरे, ग्रामसेवक जीटी खैरनार, मुख्यलिपीक राजू शिंदे, दिनकर शेलार, मिलिंद वाघ, विंचूर तलाठी ऑफिसचे तलाठी गजानन डोके, कोतवाल सागर मस्कर, सहाय्यक कोतवाल गणेश रुपवते तसेच विलास गोरे, गंगाधर गोरे, बाळासाहेब चव्हाण, कृषी अधिकारी शिंदे, सरकारी दवाखान्याचे डॉ. सचिन पवार, पोस्ट ऑफिस कर्मचारी, आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -