वाडा: सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांतील दस्तऐवजांवर नाव लिहिताना आईच्या नावाचाही समावेश करावा, अशी मागणी श्रामजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्याची प्रत पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकरी गोविंद बोडके यांना देण्यात आली.
कोणत्याही दस्तएवजावर नाव लिहिताना मुख्यत: तीन रकाने असतात. त्यात व्यक्तीचे नाव, मधले नाव आणि आडनाव हेच पर्याय उपलब्ध असतात. त्याच चौथा रकाना करुन त्यात आईचे नाव लिहिणे सक्तीचे करावे अशी मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.
याप्रसंगी श्रामजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, जिल्हा अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्षा स्नेहा पंडित-दुबे, सरचिटणीस बाळाराम भोईर यांच्यासह इतरीही कार्यकर्ते उपस्थित होते.