Tuesday, August 12, 2025

कणकवलीत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

कणकवलीत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मयूर ठाकूर (कणकवली ): देशात सर्वत्र "परीक्षा पे चर्चा" २०२३ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विद्यार्थांना मार्गदर्शन आणि मुलांचे प्रश्न समजून घेत आले व या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये भेटी दिल्या व "परीक्षा पे चर्चा" कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान ऑनलाइन च्या माध्यमातून परीक्षा पे चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे.


आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील शाळांना भेट देत कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान कणकवली कॉलेजच्या एच. पी. सी. एल. हॉलमध्ये स्क्रिन वर ऑनलाइन च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांन सोबत जो संवाद साधला तो ऐकला. दरम्यान आमदार नितेश राणे यांनीही मुलांचे स्थानिक प्रश्न समजून घेतले.


यावेळी आम. नितेश राणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष आण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, डॉ. राजश्री साळुंखे तसेच कणकवली कॉलेज कणकवली चे सर्व शिक्षक ,विद्यार्थी तसेच इतर शाळांतील विद्यार्थी या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाला उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा